प्रतिनिधी(रमेश औताडे) : धारावीतील गोरगरीब जनतेला बेघर करून त्या ठिकाणी विकास होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा इंसानियत पार्टी चे सचिव राजू दळवी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत इंसानियत पार्टी कडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ उमेदवारांची पहिली यादीची घोषणा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र सिह ठाकोर ,राष्ट्रीय मुख्य सचिव राजू दळवी,सदस्य प्रिया जोशी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजू दळवी यांनी आगामी लोकसभा निवडणूकी साठी इंसानियत पार्टीच्या उमेदवारांची नावे घोषित केली.
दक्षिण मध्य मुंबई मधून राजू दळवी , उत्तर मुंबईतून शौकत अब्दुल रफीक खान ,मुक्तार शेख उर्फ आबा ईशान्य मुंबई, योहान रोहीदास साळवे शिर्डी ,
सुदाम गाडेकर यांना जालना , धनंजय बिडकर परभणी ,
अशोक भानुदास तांबे अहमदनगर, संजय भोसले कोल्हापुर ,रंजन साळवे सभाजी नगर , स्मिता यादव सांगली , नैना वरुण नवी दिल्ली, वाय जोत्सना राणी तेलंगना , निलम सियाराम गंगवार-उत्तर प्रदेश बरेली लोकसभा, जितेंद्र ठाकोर गुजरात गांधी नगर , वारानसी
तरबेज आलम किशनगंज बिहार असे उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती पार्टी चे सचिव राजू दळवी यांनी यावेळी दिली.