ताज्या बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते कर्करोगावरील स्वदेशी कार-टी सेल उपचार प्रणालीचा शुभारंभ

प्रतिनिधी : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयआयटी मुंबई येथे NexCAR 19 या संपूर्ण एकीकृत ‘CAR – T’ सेल थेरपी प्लॅटफॉर्म या कर्करोगावरील क्रांतिकारक स्वदेशी उपचार प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

आयआयटी मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल या संस्थांच्या सहकार्याने विकसित CAR – T सेल थेरपीमुळे विशिष्ट कर्करोग रुग्णांना परवडणाऱ्या किंमतीत उपचार घेणे शक्य होणार आहे.

कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशीस चौधुरी, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक प्रा सुदीप गुप्ता, प्रकल्प प्रमुख डॉ राहुल पुरवार, आयआयटी व टाटा हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी व कर्करोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top