Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रनारी शक्तीचा सन्मानासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्या समोर नतमस्तक

नारी शक्तीचा सन्मानासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्या समोर नतमस्तक


सातारा (अजित जगताप) : सातारा शहरातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून नारीशक्तीच्या सन्मानासाठी भाजप कार्यकर्ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. डॉ. आंबेडकर पुतळा समोर नतमस्तक होऊन त्यांनी भारतीय संविधानाचा गौरव व महिलांच्या संरक्षणाची जाणीवपूर्वक शपथ घेतली.
समाजातील सर्व नारीशक्तीचा सन्मान आणि आदर व्हायला पाहिजे. भारतीय संविधान तत्त्वप्रणालीनुसार सर्व भारतीय एक संघ आहेत.कोणताही भेदभाव न करता सर्व माता-भगिनी मुली यांना समानतेची वागणूक दिलीच पाहिजे. महिलांच्या बाबतीत अपराध करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नारीशक्तीसाठी समाज जागृती अभियानाची चांगली सुरुवात केली आहे. त्याचे सर्वच जाती धर्मातील लोकांनी मनापासून स्वागत केलेले आहे.
महिला- मुली यांच्याकडे वाईट नजरेने बघणारे डोळे फोडले पाहिजेत. ,बदलापूर सारख्या प्रकरणात घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशी दिली पाहिजे. आणि राज्य सरकार याबाबत नक्कीच कठोर निर्णय करेल. असा विश्वास व्यक्त करून सातारा जिल्हाध्यक्ष श्री कदम यांनी महिला मुलींच्या संरक्षणासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात सांगितले.

महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिशा शहा यांनीही नारी शक्तीला आदरपूर्वक वागणूक व त्यांचा अपमान करणाऱ्या अपराध्यांना कडक शासन झाले पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले.

समाजातील वाईट घटनांबद्दल खेद व्यक्त करून सर्व नारीशक्तीला समान न्याय आणि आदराची वागणूक देण्यासाठी समाजाला जागृत करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सर्वांनीच मनोभावे शपथ घेतली.

यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेणू येळगावकर, प्रदेश चिटणीस सुनिशा शहा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, सचिन साळुंखे, अप्पा कोरे, नगरसेवक सुनील काळेकर, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे , युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे यांच्यासह महिला पदाधिकारी तसेच भाजपचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोष करून महिला व मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणाने भाजप कार्यकर्त्यांनी पार पाडावी. कोणत्याही मुलाहिजा न ठेवता गुन्हेगारांना कडक शासन व्हावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments