Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रबेलोशी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक ; देशसेवेनंतर आपल्या गावी...

बेलोशी दुमदुमली! निवृत्त जवानाची गावानेच काढली वाजतगाजत मिरवणूक ; देशसेवेनंतर आपल्या गावी परतलेल्या जवानाच्या जंगी स्वागताने जवानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या

पांचगणी : फुलांनी सजवलेली जीप….भव्य बाईक रॅली….महिला, युवकांचा सहभाग , घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण, फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा गजर अन भारत माता की जय च्या निनादात आगळ्या वेगळ्या वातावरणाने बेलोशी अक्षरशः दुमदुमुन गेली. त्याला निमित्त होते, गावचे सुपूत्र अन् भारतीय लष्कारातील जवान सागर बेलोशे यांची निवृत्ती. देशसेवेनंतर आपल्या मायभूमीत परतलेल्या जवानाच्या जंगी स्वागताने जवानाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

बेलोशी (तालुका जावळी ) येथील जवान सागर विठ्ठल बेलोशे यांनी देश सेवा पूर्ण करून ते मयभुमिकडे आले. सैनिक म्हणजे देशाचा कणा, समाजाचे भूषण. या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गावाने स्वातंत्र्य दिनी निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्याचा, भव्य असा गौरव करण्याचा आगळा निर्णय घेतला. शेतकरी आणि गरीब कुटुंबात जन्मलेले श्री. बेलोशे यांना लहानपणापासून सैन्याचे वेड होते. मेहनतीसह जिद्दीने ते इंडीयन आर्मी या सैन्यात भरती झाले. त्यांचा देश सेवेचा प्रवास सुरू झाला. पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू काश्मिर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी देश सेवा केली. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांना सामोरे जात भारत मातेचे रक्षण करणे हेच अंतिम ध्येय त्यांनी पूर्ण केले.
सेवा पूर्ण करून आलेल्या सागर बेलोशे यांचे गावी जोरदार स्वागत झाले. त्यावेळी त्यांचे सपत्नीक अविस्मरणीय स्वागत झाले. या वेळी गावातील सुवासिनींनी जवानांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी “भारत माता की जय’च्या घोषणा दिल्याने गाव अक्षरशः दणाणून गेले होते.

ग्रामस्थांनी तसेच ग्रामविकास मंडळ, ग्रामपंचायत, दत्तात्रय कळंबे महाराज ट्रस्ट, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेलोशी यांनी सागरचे स्वागत भव्य प्रमाणात करून गावातील, परिसरातील युवकांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळावी, निवृत्त झालेल्या सैनिकांविषयी ऋण व्यक्त व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे यावेळी नितीन गावडे यांनी सांगितले.
यावेळी जवानांची करहर ते बेलोशी अशी जीपमधून आणि भव्य बाईक रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले. यामध्ये गावातील महिला, मुली यांचा सहभाग अवर्णनीय होता.
वैकुंठवासी दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजर फटाक्यांची आतषबाजी अन् फुलांचा वर्षावात मिरवणूक झाली. गावात ठिकठिकाणी त्यांचे औक्षण केले. ग्रामपंचायत, ग्रामस्थ, युवक, गावातील सार्वजनिक मंडळांतर्फे यादव यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहा. पोलीस उपनिरीक्षक डी.जी शिंदे, डॉ विजय दिघे, मनोहर देशमुख, सरपंच उमेश बेलोशे तसेच विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नितीन गावडे यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन व आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments