Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रनवीन महाबळेश्वर प्रकल्प विषयी १०५ गाव समाजाची जनजागृती बैठकीचे आयोजन

नवीन महाबळेश्वर प्रकल्प विषयी १०५ गाव समाजाची जनजागृती बैठकीचे आयोजन


तापोळा- नवीन महाबळेश्वर या प्रकल्पात जावली महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. या गावातील लोकांना प्रकल्पाची माहिती व्हावी. प्रकल्प काय आहे, स्थानिकांना होणारा फायदा, MSRDC चा विकास आराखडा, याची माहिती प्रकल्पात समाविष्ट होणाऱ्या गावातील लोकांना मिळावी. प्रकल्प आराखडा समजून घेता यावा यासाठी नवीन महाबळेश्वर प्रकल्प जनजागृती बैठकीचे आयोजन दिनांक २२/८/२०२४ वार गुरुवार रोजी सकाळी ११.०० वाजता श्री पद्मावती मंदिर तापोळा येथे १०५ गाव समाज सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे..
या बैठकीत प्रकल्पाची माहिती देण्यासाठी MSRDC चे अधिकारी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे प्रकल्पा विषयी नेमकी व अचूक माहिती मिळणार आहे.
नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प अनेक वर्षे विकासापासून वंचित असणाऱ्या ग्रामीण भागातील गावाच्या विकासातील कलाटणी देणारा ठरू शकतो.
सर्व गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरावरील पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहावे…
या बैठकीसाठी १०५ गाव समाजातील समाज बांधब यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments