Monday, August 4, 2025
घरमहाराष्ट्र"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

ठाणे  : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेचा”राज्यस्तरीय शुभारंभ शनिवार दि.17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 01 ते 04 यावेळेत शिवछत्रपती क्रिडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे येथे “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री, सहकार, नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर रूक्मिणी किसन मोहोळ, उपमुख्यमंत्री तथा मंत्री, गृह, विधी न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मंत्री, वित्त व नियोजन, मंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम पुणे बालेवाडी येथे होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण ठाण्यातील गडकरी रंगायतन, तलावपाळी, ठाणे येथे पाहता येणार आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम गडकरी रंगायतन, तलावपाळी, ठाणे (पश्चिम) येथे शनिवार, दि.17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत आयोजित केला आहे.
तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिला भगिनींनी तसेच “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय गठीत करण्यात आलेल्या निवड समितीचे सन्माननीय अध्यक्ष/सदस्य यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे जिल्हास्तरीय समिती सदस्य सचिव श्री.अशोक शिनगारे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments