Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रदेश एकसंघ ठेवण्यासाठी संविधान टिकणे महत्त्वाचे! गिरणी कामगारांच्या ध्वजारोहण प्रसंगी सचिन अहिर...

देश एकसंघ ठेवण्यासाठी संविधान टिकणे महत्त्वाचे! गिरणी कामगारांच्या ध्वजारोहण प्रसंगी सचिन अहिर यांचे प्रतिपादन


मुंबई : देशाला असीम त्यागातून स्वातंत्र्य मिळाले,त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे‌‌ काम संविधानाने केले आणि लोकशाही तर त्याचा आत्मा ठरला आहे ,तेव्हा देश एकसंघ ठेवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेकर यांनी दिलेलं संविधान अधिक मजबूत झाले पाहिजे,असे उद्गार राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार,माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी येथे ध्वजारोहण प्रसंगी काढले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन परेल येथील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.संघटनेचे अध्यक्ष, शिवसेने चे उपनेते सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.त्यावेळी गिरणी कामगार प्रतिनिधी कार्यकर्त्यांपुढे बोलताना श्री.अहिर पुढे म्हणाले,गेल्या ६० वर्षात देशात काहीच घडले नाही,अशी आज सर्रास
टीका केली जाते.पण अशी टीका करणाऱ्यांना सांगावे‌ लागेल की,देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आयाती पेक्षा निर्यातीत देशाने‌ पुढचे पाऊल टाकले,अंतराळ क्षेत्रात तर नेत्रदीपक कामगिरी करून जगात भारताला नाव मिळवून दिले.अशी देशाने विविधांगी क्षेत्रात प्रगती घडवून आणली असतांना, गेल्या साठ वर्षात,मागील‌ सरकारने काहीच केले नाही,असे म्हणण्यात काय‌ अर्थ आहे? संसदेच्या चालू अधिवेशनात गेल्या १० वर्षात ४९ हजार कारखाने बंद होऊन तीन लाखावर काम गार बेकार झाले,अशी माहिती वर्तमानपत्रातही‌ ते प्रसिद्ध झाली आहे.प्रत्यक्षात बोरोजगारीची आकडेवारी मोठी आहे.पण या प्रश्नावर सरकारचे काय उत्तर आहे?आज देशातील चालू सरकारी मालकीच्या २३ गिरण्या गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळा पासून बंद आहेत.राष्ट्रीयस्तरावरचा लढा आम्हीच पुढे नेत आहोत. पण केंद्र सरकार म्हणते ते आमचे काम नाही?या अशा बंद पडलेल्या अनेक कारखान्यांतील कामगारांच्या मुलांचे‌ शिक्षण रखडले, त्यांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे.त्यांनी‌ कुणाकडे न्याय‌ मागायचा? तेव्हा या अशा प्रश्नाविरुध्द लढण्यासाठी आता कामगार वर्गाला संकल्प करावा लागेल,असेही आमदार सचिन‌ आहिर आपल्या भाषणात म्हणाले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि रामिम संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी‌ त्यावेळी उपस्थित होते.जी.डी आंबेकर कॉटरिंग कॉलेज,सेवादल विभागाने याकामी मोलाचे सहकार्य केले!•••

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments