Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रराज्यातील मेडिकल कॉलेज मध्ये मानसोपचार तज्ञ नेमण्याचे सरकारचे आदेश

राज्यातील मेडिकल कॉलेज मध्ये मानसोपचार तज्ञ नेमण्याचे सरकारचे आदेश

मुंबई : विद्यार्थ्यांना येणारे वैफल्य व अन्य मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्याच्या डिजीटल युगात विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक तणावात वाढ झाली आहे. अनेकदा विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतात. ते आपल्या भावनाही व्यक्त करत नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या समस्येवर निदान होऊन त्यांना समुपदेशन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद येऊ शकतो. मानसोपचार विभागाचे प्राध्यापक, मानसोपचार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व अधीक्षक यांची तीन सदस्य समिती राज्यातील प्रत्येक वैद्यकीय शिक्षण संस्थेवर देखरेख करेल. यात विशेष हेल्पलाईन, नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्यान, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संवाद आदी उपक्रम हाती घेतले जातील. दोन समुपदेशकांची दरमहा ३० हजार वेतनावर कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments