ताज्या बातम्या

बंद असलेले जन्म, मृत्यू प्रमाणपत्र लवकरच ऑनलाइन

मुंबई : मुंबईतील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात येतो. ही प्रणाली अद्ययावत करण्याची कार्यवाही महाप्रबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे ऑनलाइन पद्धतीने तसेच सहज प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकतील. सध्या अनेकांना जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. २४ जून २०२४ नंतर जन्म- मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करताना, नागरिकांनी त्यांचा अचूक ईमेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास महापालिका वॉर्डमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयांमार्फत ई-मेल आयडीवर हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top