ताज्या बातम्या

लावणी कलावंत महासंघातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप व वृक्षारोपण


प्रतिनिधी : कलेतून समाजाची सेवा करण्याचा ध्यास लावणी कलावंत महासंघाचा आहे.दरवर्षी वर्धापनदिन सोहळ्यात रसिकांकडून जमा होणाऱ्या वह्या पेन तसेच महासंघातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येते.यावर्षी काम करूया लाख मोलाचे, निसर्ग आणि शिक्षण यांच्या संवर्धनाचे या न्यायाने भांडुप येथील अमरकोर विद्यालयात शालेय वस्तू व खाऊ वाटप १०० विद्यार्थ्यांना करण्यात आले.तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.महाराष्ट्र बाजार पेठेचे अध्यक्ष डॉ.कौतुक दांडगे,शाळेचे संस्थापक म्हात्रे ,मुख्यधापक हांडे ,महासंघाचे संस्थापक संतोष लिंबोरे पाटील,विश्वस्त जयेश चाळके,अध्यक्षा कविता घडशी तसेच महासंघाचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होता.महासंघाच्या कलाकारांनी गायन व नृत्यातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top