प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका जी-उत्तर विभागातील चतुर्थी श्रेणी वर्गातील मालमत्ता विभागात कार्यरत असणाऱ्या श्रीमती.गौरी परमार यांनी यंदा एस.एस.सी.परिक्षेत यश संपादन केल्याने सहाय्यक अभियंता इरफान काझी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.नोकरी करत तिने यश संपादन केलेबद्दल त्यांनी तिचे कौतुक देखील केले.
श्रीमती. गौरी परमार यांच्या शिक्षणातील या यशस्वी कामगिरी मुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन सर्वं स्तरांमधून श्रीमती.गौरी परमार हिचे अभिनंदन होताना दिसत आहे.
