प्रतिनिधी : साप्ताहिक मार्मिक चे नाट्य समीक्षक संजय डहाळे यांना यंदाचा अंबुद पुरस्कार समारंभ पूर्वक कुर्ला येथील प्रबोधनकार नाटक घर येथे नाट्यतज्ञ पद्मश्री प्राध्यापक वामन केंद्रे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला .पत्रकारिता ,साहित्य ,संस्कृती आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात गेली चार दशके मोलाची कामगिरी केल्याबद्दल पल्लवी फाउंडेशन आणि स्वामीराज प्रकाशन यांच्यातर्फे हा पहिला अंबुद पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. डहाळे यांना पुरस्कार प्रदान केल्याचे वृत्त याअगोदर वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले होते. फक्त औपचारिकता राहिली होती.ती सन्मानपूर्वक आज त्यांना पहिला अंबुद पुरस्कार संस्थेने दिल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जेष्ठ पत्रकार,नाट्य समीक्षक संजय डहाळे यांना अंबुद पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES