ताज्या बातम्या

धारावीत महापालिका अंतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान; मात्र मलनि:सारण विभागाच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले

प्रतिनिधी : धारावीतील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे.गेले तीन वर्षे प्रशासनाच्या हाती कारभार आहे.नगरसेवकांची जबाबदारी  असते,त्यामुळे ते सतत विभागातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन असतात. मात्र सध्या नगरसेवक नसल्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत.त्यामुळे प्रशासन तसेच महापालिका ग/उत्तर  मलनि:सारण देखभाल दुरुस्ती विभाग व पर्जन्य जलवाहिनी विभाग जबाबदार आहे. त्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाणी पुरवठा विभाग कोणालाही पाण्याची लाईन टाकण्यासाठी परवानगी देतात. मात्र ते लोक चुकीच्या पद्धतीने खोदकाम करून पाणी लाईन टाकतात,या पाण्याच्या लाईनही चोरीच्या पद्धतीने टाकल्या जातात. मलनि:सारण विभाग ग/उत्तर विभागाने धारावीतील अनेक ठिकाणी चुकीच्या (ड्रेनेज) लाईन टाकल्या आहेत. त्याचा त्रास महापालिका स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचारी यांना सुद्धा होत आहे.

 आज गुरुवार दि.१८ जुलै २०२४ रोजी प्रभाग १८६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी देखील ड्रेनेज लाईन  व पर्जन्य जलवाहिनी चोक अप झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या विभागात मनपा तर्फे दत्तक योजना राबवली जाते.या संस्थेचे संस्थाचालक दत्ता कदम, ज्ञानदेव डोईफोडे, असलम शेख, अन्वर शेख, नितीन कटके, ज्ञानेश्वर शिंदे, यांनी हे स्वच्छता मोहीम राबवली होती,यावेळी  मनपाचे अधिकारी गडकरी, पाटील आणि वावेकर उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top