प्रतिनिधी : बामणोली विभागातील सामाजिक कार्यकर्ते व थोर उद्योजक अंधारी गावचे सुपूत्र के.के.शेलार साहेब यांचा ५० वा वाढदिवस विवीध सामाजिक संस्था व १०५ गावातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी संकल्प प्रतिष्ठान २२ गाव,स्वराज्य प्रतिष्ठान,सातारा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतील कोअर टीम व मान्यवर मंडळी व १०५ गावातील मंडळी उपस्थित होते.हा कार्यक्रम आमदार श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या उपस्थितीत अतिशय छान पार पडला.यावेळी निपाणी गावची कन्या प्रतिक्षा उत्तेकर यांच्या समधूर आवाजात गायनाचा कार्यक्रम पार पडला.५० वा वाढदिवसाचा केक कापल्यानंतर उपस्थित मान्यवरमंडळीनी श्री.के.के.शेलार साहेबाना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या,नंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडल्यावर कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.बरेच लोक शेलार साहेब यांच्या प्रेमापोटी गावावरून मुंबईला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
