ताज्या बातम्या

येणपे प्राथमिक शाळेचे इयत्ता पाचवीचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणपे ता.कराड येथील स्वरूप दिनेश थोरात २८२ गुण राज्यात ६वा, जिल्ह्यात ३रा,तन्वी गणेश पवार २६८ गुण जिल्ह्यात ७वी,अर्णव विलास शिंदे २५४ गुण जिल्ह्यात ६८ वा, शौर्यराज रणजीतसिंह थोरात २५० गुण जिल्ह्यात ८९ वा, जुई कृष्णात शिंदे २४८ गुण जिल्ह्यात १०३ वी, इंद्रजीत हणमंत थोरात २४४ गुण जिल्ह्यात १३४ वा आला.
त्यांना अमित लक्ष्मण कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले. या नेत्रदीपक यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संजय नायकवडी, सर्व शिक्षक, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, विस्ताराधिकारी जमिला मुलाणी,केंद्रप्रमुख सदाशिव आमणे,निवास पवार, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांसह मान्यवरांनी अभिनंदन केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top