Saturday, September 20, 2025
घरदेश आणि विदेशकु.प्रिशा संतोष शेट्टी हिला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक

कु.प्रिशा संतोष शेट्टी हिला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक

प्रतिनिधी : इंडिया तायक्वांदो च्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जुनिअर राष्ट्रीय स्पर्धा कटक ओरिसा येथे झाल्या यामध्ये सातारा जिल्हा अम्यॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ची खेळाडू कु.प्रिशा संतोष शेट्टी ( आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू ) हिने  जुनिअर मुली -68 किलो गटामध्ये सुवर्ण पदक महाराष्ट्र ला मिळवून दिले.
प्रिशा ही मागील 8 वर्षपासून तायक्वांदो खेळाचं प्रशिक्षण घेत असून तिने या आधी वर्ल्ड तायक्वांदो चॅम्पियशिप खेळली असून आशियाई तायक्वांदो चॅम्पिअनशिप स्पर्धेत मध्ये भारताला कॅडेट गटातील महाराष्ट्र चे मुली चे ब्रॉन्झ मेडेल देखील दिले आहे.
तिला प्रशिक्षक श्री.अक्षय खेतमर, नंदिनी खेतमर व कराड तालुका अध्यक्ष श्री.अमोल पालेकर यांचे मार्गदर्शन लाभले

सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुनील कोडगुले सरचिटणीस श्री.संतोष सस्ते, सचिव श्री.विजय खंडाईत, खजिनदार श्री.गफार पठाण या सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments