ताज्या बातम्या

पर्वत रोडच्या कामासाठी मंत्री मकरंद आबा पाटील यांचे तातडीने निधी उपलब्धतेचे निर्देश! वाघावले गावच्या विकासासाठी एच. बी. जंगम यांचा पुढाकार

मुंबई : वाघावले गावचे सुपुत्र श्री. एच. बी. जंगम यांनी आज मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जननायक नामदार मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन पर्वत रोडच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी मंत्री महोदयांना सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनाची तातडीने दखल घेत मंत्री मकरंद आबा पाटील यांनी पर्वत रोडचे काम मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पर्वत रोडच्या कामाला लवकरच गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी जंगम यांनी केलेल्या या प्रयत्नांचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. निवेदनाची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल श्री. एच. बी. जंगम यांनी मंत्री मकरंद आबा पाटील यांचे आभार मानले.

Scroll to Top