सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्य आयोगाच्या सूचना व मार्गदर्शन नुसार भिकभुक्त व भूक मुक्त महाराष्ट्र संकल्पनेंतर्गत सर्वेक्षण तक्रार नोंदी व योजना सहाय्यता उपक्रम राबवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. या मागणीसाठी सुरक्षा सहाय्यता तक्रार निवारण मदत कक्ष कार्यकर्त्यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पुरवठा शाखेमध्ये लाक्षणिक आंदोलन केले. याबाबत माहिती अशी की, दिनांक २२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनुसार सुरक्षा सहाय्यता तक्रारी मदत कक्ष मार्फत करण्यात येणाऱ्या संरक्षणातून संकलित माहिती नागरिकांच्या तक्रारी समस्या व उपक्रमाच्या प्रगती अहवाल थेट महाराष्ट्र राज्य आयोगाकडे सादर करण्यात येईल. स्थानिक सर्व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार संबंधी सक्षम विभागाशी समन्वय व पाठपुरावा करण्यात येईल. वरील संदर्भात बैठकीत देण्यात आलेला सूचना मार्गदर्शकानुसार भिकमुक्त व भूक मुक्त महाराष्ट्र या संकल्पनेचे अनुषंगाने क्षत्रिय सर्वेक्षण नागरिकांचे अन्नसुरक्षाविषयक तक्राची नोंदणी, वंचित व पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे. तसेच संबंधी योजना बाबत सहायता व मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी प्रशासकीय सहकार्य अपेक्षित आहे. संबंधित अधिक कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी सहकार्य करावे. या प्रमुख मागणीसाठी विभागीय अधिकारी विकास थोरात जिल्हा, विकास प्रकल्प किरण पवार, अर्चना मदने, रमेश सोनवणे, तालुका प्रकल्प अधिकारी कोमल ढोबळे, नयन साळुंखे, प्रियंका नरुटे, धनश्री नलवडे, निलेश बोतलजी, भाग्यश्री महापुरे, मयुरी शेडगे, अशोक सपकाळ, उदयसिंह बागाव, सोमनाथ मिसाळ, धनाजी यादव, महादेव बागाव, तसेच पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी अमोल बनकर, आणि कीर्ती नरुटे, अश्विनी मदने, अंजली ढोले, साक्षी जाधव, अश्विनी बोडके, मोनिका इदाते, तेजस्विनी गोरे, सोनाली गायकवाड ,धनश्री थोरात व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, याबाबत महिला बाल विकास विभाग सातारा यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे.




