सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात आंतरजातीय विवाह विरोध करण्यासाठी सातत्याने खोट्या तक्रारी करून त्रास दिला जात आहे. सातारा तालुक्यातील या कौंदणी गावांमधील एका मराठा समाजाच्या मुलीने बौद्ध समाजातील युवकासोबत आंतरजातीय विवाह केला. त्याचा राग म्हणून संबंधित मराठा कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकणे खोटे आरोप करणे(जादूटोणा करता असे खोटे आरोप) खोट्या तक्रारी दाखल करून नाहक त्रास देण्याचा प्रकार होत आहे. या बाबत सातारा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी होऊ लागलेली आहे. कोंदणी तालुका सातारा या ठिकाणी दोन जातीच्या मुलगा व मुलगी यांचे लग्नाचे वयाने सज्ञान असल्यामुळे त्यांनी दोन्हीही समाजाच्या अर्थात बौद्ध आणि मराठा समाजाच्या कुटुंबांनी संमतीने आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाचा राग मनात धरून विरोध करण्यासाठी सातत्याने कौंदणी गाव येथील तंटामुक्ती कडे खोट्या तक्रारी व पोलिसांना हाताशी धरून खोट्या तक्रारी नोंदवल्या जात आहे. त्या दोघांचाही संसार उध्वस्त करण्यासाठी सातत्याने मानसिक त्रास व दबाव आणला जात आहे. यामुळे सर्वधर्मसमभावाच्या विचारांनाच मुठमाती दिली जात आहे. संबंधित जयसिंग यादव, विकास यादव विलास यादव आणि कुटुंबीय व्यक्तीने यापूर्वी गावातील ग्रामसेवकास धमकी दिली. शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. गावात सातत्याने भांडण करून गावाला वेठीस धरले जात आहे. याच व्यक्तीच्या आर्थिक बळावर काही पोलीस हे धन दांडगे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालून आंतरजातीय विवाहास परवानगी दिलेल्या मराठा मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देण्याची सुपारी घेत आहेत. या प्रकरणाची ही चौकशी करावी. अशी मागणी केली जात आहे. संबंधित प्रकरणाबाबत सी.सी.टी.व्ही. फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग, प्रथमदर्शी साक्षीदार, वैद्यकीय प्रमाणपत्र याचीही पडताळणी करून सत्यता लोकांसमोर आणावी. ही प्रमुख निवेदनाद्वारे मागणी केली आहे. भारतीय संविधानातील कलम १४ समाधीचा अधिकार आणि कलम १५ भेदभावस प्रतिबंध करण्याची घटनात्मक हमी देते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता२०२३ व भारतीय न्याय सविता २०२३ मधील लागू तरतुदीनुसार चौकशीत कोणतेही व्यक्तीकडून खोटी माहिती खोटे पुरावे किंवा कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्यास लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात कायद्याने तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. आज संविधानाचा अवमान असून या विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा गुणरत्न मावळा तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप वामन जाधव व प्रवीण शेळके, ऋषिकेश गायकवाड यांनी दिला आहे. यासाठी आवश्यक सर्व कागदपत्र पोलीस अधीक्षक यांच्या निवेदनासोबत जोडलेली आहे. आंतरजातीय विवाहाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या या कुटुंबाला इतर लोक घाबरत आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी अनेकांच्या हालचाली सुरू झाल्यामुळे न्यायासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देऊन व्यथा मांडली आहे.




