मुंबई (मोहन कदम /शांताराम गुडेकर ) : गेली ३६ वर्षाहून अधिक अन्नदान,सेवादान, श्रमदान द्वारा सामाजिक योगदान अखंडपणे कार्यरत ठेवणारे श्री.मंगेश रासम यांचा विजन इंडिया संस्थेद्वारा विशेष सत्कार करण्यात आला.
पितृपक्षातील अन्नदान, कोविड मधील निरंतर भोजनदान या समवेत रुग्णसेवेसाठी साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अखंडपणे कार्यरत आहे.यांच्या कार्याची दखल घेत विजन इंडिया संस्था जी तीन देशातून कार्यरत आहे या संस्थेद्वारा त्यांना ” महात्मा गांधी शांती सद्भावना पुरस्कार – २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले.भारतीय नौदलातील सर्वश्रेष्ठ अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त कमांडर वीरेंद्र कुमार जेटली यांच्या प्रमुख उपस्थितीत शौर्य चक्र प्राप्त पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे,शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी श्री.मंगेश नाईक तसेच अनेक गणमान्य व्यक्ती विशेष यांच्या उपस्थितीत स्वप्निल आणि नंदकुमार विजन इंडिया अध्यक्ष यांनी सदर सन्मान श्री.मंगेश रासम यांना प्रदान केला.अनेक आदिवासी परिवाराचे पालनपोषण करणाऱ्या श्री. मंगेश रासम यांना कमांडर जेटली द्वारा शाल आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आल. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक संस्था, मंडळ पदाधिकारी आणि पत्रकार मंडळी यांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या




