ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे हे अमित सेनेचे मुख्य नेते – गणेश अहिवळे

सातारा(अजित जगताप) : शिवसेनाप्रमुख व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेमध्ये अनेकांना घडवण्यात आले. माजी कामगार मंत्री साबिर शेख सारखे निष्ठावंत तर एकनाथ शिंदे यांच्यासारख्यांनाही ओळख दिली. आज दुर्दैवाने एकेकाळी शिवसैनिक असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आता भाजप नेते व गृहमंत्री अमित शहांच्या अमित सेनेचे पक्षनेते झाले आहेत . याचे मनापासून वाईट वाटत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातारा शहर प्रमुख गणेश आहिवळे यांनी सातारा येथे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. चार वर्षांपूर्वी या राजकीय संकटामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. सामान्य माणसांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा खून करून हुकूमशाही पद्धतीने कारभार आता सुरू आहे. शिवसेनेने राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत सत्तेत राहून आपले मूळ हिंदुत्व सोडले आहे, अशी भावना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नाहीत आणि त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नाही, असा ही आरोप आमदारांनी केला होता. सध्या साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या बोटापर्यंत जखम गेली. पण , गद्दारांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला नाही. शिवसेना पक्षनेते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला डावलले जात असल्याचा व एकाच कुटुंबाचे वर्चस्व वाढत असल्याचा असंतोष एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बोलून दाखवला होता. आता बारीक सारीक गोष्टीसाठी त्यांना नवी दिल्ली येथे जाऊन भाजप नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारात हजेरी लावावी लागत आहे. २० जून २०२२ रोजी विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन अचानक सुरत (गुजरात) येथे गेले होते.सुमारे ४० शिवसेना आमदार आणि १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना मिळाला. आता यंदाच्या वर्षी शिवसेनेचे सहा खासदार त्यांच्यासोबत आहेत. चार वर्षाच्या काळामध्ये शिवसेना नेत्यांवर टीका करणे. हाच एक कलमी कार्यक्रम त्यांनी आखला आहे. भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या डोक्यात फक्त शिवसेना नेते व उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका- टीका आणि टीका करण्याची कामगिरी त्याच्याकडे दिली आहे. ही डोकेदुखी त्यांना नाहक सहन करावी लागत आहे. मराठा आरक्षणाबाबत भूलथापा दिल्यामुळे आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका करून व्याजासह परतफेड सुरू केलेले आहे. आपण जेव्हा दुसऱ्याला एक बोट दाखवतो. त्यावेळेला चार बोट आपल्याकडे असतात. याचा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुभव घेत आहेत. मुंबईमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने आपलं मत त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना व्यक्त करता येत नसल्याने ते अधून मधून आपल्या दरेतांब गावी येऊन बिना निरोपाच्या आलेल्या काही प्रसार माध्यमांच्या सोबत शेती करत आहेत. लंडनला पुरस्कार मिळतो. पण, उत्कृष्ट शेती म्हणून कधीही त्यांना पुरस्कार मिळाला नाही. तो सुद्धा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार माध्यमाच्या काही प्रतिनिधींनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. अशा पद्धतीने गणेश आहिवळे यांनी शाब्दिक खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्राच्या समोर अनेक प्रश्न असताना फक्त शिवसेना नेत्यांवर व टीकाटिपणी करणे. एवढेच आता हाती राहिलेले आहे. आज स्वाभिमानी व पुरोगामी महाराष्ट्रामधील मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील, अभिजीत दिपके, विद्यानंद बापट व पुणे येथील संतोष पंडित यांनी सामान्य माणसांचे जलद प्रश्न मांडण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या खांद्यावर घेतला आहे. अमित सेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी फक्त अमित सेनेच्या आदेशाचे पालन करणे. असं त्यांच्या गेली चार वर्षातील सूर दिसत आहे. कधी हिंदी… कधी गुजराती… व कधी मोडक्या थोडक्यात इंग्रजी भाषेत भाषण करून कोणीही राष्ट्रीय नेता होत नाही. आजही ठाकरे ब्रँड देशात लोकप्रिय आहे. सामान्य शिवसैनिक नक्कीच परिवर्तन घडवतील. असाही विश्वास श्री गणेश आहिवळे यांनी व्यक्त केला आहे. अपघाताने मिळालेल्या सत्तेचा वापर हा भाजपसाठी न करता त्यांच्यासोबत अगदी विश्वासाने आलेल्या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांच्या सामान्य मतदारांच्या हितासाठी करावा. अन्यथा सनम हम भी तुम्हे साथ लेके डुबेंगे,, हे भाजपने इतर पक्षांसोबत दाखवून दिले आहे तशी गत होईल असे त्यांनी भाकीत केले आहे.

Scroll to Top