ताज्या बातम्या
राष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्र प्रदेशाची आढावा व महापरिसंवाद निर्णायक बैठक तसेच पदनियुक्ती प्रदान सोहळा पुण्यात संपन्नपालकमंत्री बदलाबाबत सातारा जिल्ह्यात ना उत्सुकता.. ना पाठिंबा- संदीप पवारराज्य अन्न आयोगाच्या नियुक्त्या नियमावलीनुसारच करा – नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; पत्रकार परिषदेत पारदर्शकतेची मागणीगोविंदांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका रुग्णालयांत विशेष वॉर्ड व वैद्यकीय सुविधा द्या – भाजयुमो मुंबईची महापौरांकडे मागणीगोविंदांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका रुग्णालयांत विशेष वॉर्ड व वैद्यकीय सुविधा द्या – भाजयुमो मुंबईची महापौरांकडे मागणी

गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका रुग्णालयांत विशेष वॉर्ड व वैद्यकीय सुविधा द्या – भाजयुमो मुंबईची महापौरांकडे मागणी

मुंबई : आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), मुंबईच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहसी क्रीडा परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने गोविंदा सहभागी होतात. उंच मानवी मनोरे रचताना अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे जखमी गोविंदांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर दि. ४ आणि ५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोविंदांसाठी विशेष वॉर्ड आणि स्वतंत्र बेड राखीव ठेवावेत, आवश्यक वैद्यकीय पथके तैनात करावीत, औषधोपचार तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
दहीहंडी उत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच प्रत्येक गोविंदाच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा भाजयुमो मुंबईच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Scroll to Top