सातारा(अजित जगताप) : माणगंगा नदी पात्रातील यात्रा पटांगणा शेजारी बंधारा बांधण्यात आल्या होता. हा बंधारा दिनांक २१ मार्च २०२६ रोजी ब्रेकरच्या साह्याने बेकायदेशीर तोडला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. अधिकाऱ्यांच्या टोलवा टोलविणे अखेर आंदोलक अजिनाथ लक्ष्मण केवटे यांच्यावर आता स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे. म्हसवड येथील अपर तहसीलदार कार्यालयाच्या पुढे आत्मदहन करण्याचाही त्यांनी इशारा दिलेला आहे. म्हसवड येथील ग्राम विकास मंत्री यांचे निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीने ब्रेकरच्या साह्याने बंधाऱ्याची चिरफाड केली. असे आंदोलन अजिनाथ केवटे यांनी निवेदनात नमूद करून त्यांच्यावर कारवाईची मागणी सातत्याने करण्यात आली आहे. ही माहिती देण्यासाठी त्यांनी सातारा येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
संबंधित बंधाऱ्याबाबत सातारा पाटबंधारे उपविभाग दहिवडी यांनी दिनांक ८ मे रोजी पत्र दिले असून सदरचा बंधारा सातारा पाटबंधारे उपविभाग दहिवडी गोंदवले बुद्रुक या कार्यालयाच्या आखत्यारित येत नाही.
अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय म्हसवड तालुका माण यांनी दिनांक एक जून रोजी पत्र पाठवून सदरची बाब या कार्याशी निगडित नसलेबाबत कळवले आहे. सदरचा बंधारा कोणत्या कार्यालयाच्या आखत्यारीत येत आहे. याचा बोध होत नसल्याने कळवले आहे.
दिनांक २५ जून २०२६ रोजी अध्यक्ष, माण देशी फाउंडेशन, म्हसवड तालुका माण जिल्हा सातारा यांना कागदपत्रे सादर करणेबाबत वारंवार कळवूनही अद्याप कागदपत्र सादर केलेले नाहीत. तरी संबंधित कागदपत्र तात्काळ कार्यालयाकडे सादर करावेत असे दुसरे पत्र दिले आहे. माणदेशी फाउंडेशन ने २९ जून रोजी अपर तहसीलदार माण यांना पाठवलेल्या पत्रामध्ये सदरचे बंधारे पूर्ण झाल्यानंतर पुढील देखभाल कामी ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात स्वाधीन केले आहेत. त्या अनुषंगाने म्हसवड नगर परिषद यांच्याकडे हस्तांतरित केलेले आहे. असं नमूद केले आहे.
तर म्हसवड नगर परिषदेने २७ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी यांनी पत्रात नमूद बंधारा म्हसवड नगर परिषदेमार्फत करण्यात आलेलं नाही. त्यामुळे संबंधित बाब या कार्याची निगडित नाही. असे स्पष्ट केले आहे. दिनांक २३ जुलै रोजी नदीवर बंधारा बांधण्याचे काम तसेच देखभाल दुसरी काम या कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे सदरचा बंधारा या कार्यालयाकडून हस्तांतर करून घेतले बाबतचे कोणतेही कागदपत्रे या कार्यालयाकडे आढळून येत नाही. असे लेखी कळवले आहे. वास्तविक पाहता शासनाचा निधी खर्च केलेल्या बाबी बाबत शासकीय अधिकारीच समाधानकारक उत्तर देत नसल्याने याबाबत संशय अधिक बळावलेला आहे. आंदोलन अजिनाथ केवटे यांनी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी या बाबीकडे आतापर्यंत पंधरा ते वीस हजार खर्च करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल तर याला लोकशाही म्हणावी का? असा आता प्रश्न सामान्य माणसांना पडला आहे.
————————————-
फोटो– सातारा येथील पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना आंदोलन आजिनाथ केवटे (छाया – अजित जगताप सातारा)




