सातारा (अजित जगताप) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मधील मौजे झाडाणी तालुका महाबळेश्वर या गावामध्ये नागरी सुविधा देण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी विकास केला नाही पण धन दांडग्यांच्या सुख सोयीसाठी निधीची शिफारस करणाऱ्या अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे युवा नेते विराज शिंदे यांनी गंभीर आरोप करून झाडाझडती घेतली आहे.
सातारा येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी मांडणी करताना त्यांनी सांगितले की मानवी लोक वस्ती नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांनी जनतेच्या हितासाठी नव्हे तर धन दांडगे यांच्या हितासाठी शासकीय निधीचा स्वार्थासाठी वापर केला आहे. वीज वितरण कंपनीच्या प्रामाणिक व होतकरू अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला .या दबावापोटी झाडाणी येथे बेकायदेशीर रिसॉर्ट उभारणी करून वीज पुरवठा करण्यासाठी शासकीय निधी वापरल्यामुळे आमदार पाटील यांची आमदारकी रद्द करावी व सीबीआय व इतर गुप्तहेर यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. वेळ पडल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार अशी माहिती काँग्रेसचे युवा नेते विराज शिंदे यांनी दिली.
झाडाणी ६४० एकर जमीन खरेदी प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण गाजू लागले आहे.त्याचा शोध घेतला असता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत दिनांक १६ मार्च २०२३ रोजी ५१ लाख ८६ हजार५४९ एवढ्या निधीचा वापर करून वादग्रस्त जागेवरती रिसॉर्ट उभारणीसाठी विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. ही बाब त्यांनी उघडकीस आणली. यासाठी शासकीय पत्र व्यवहार त्यांनी पत्रकारांना दाखविला.
सध्या वाई- महाबळेश्वर- खंडाळा तालुक्यातील अतिदुर्गम व मागास भागातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी साधनसामुग्री मिळत नाही. दुसऱ्या बाजूला अनेक गावांनी शिफारस करूनही त्यांना वीज वितरण कंपनीकडून निधी अभावी साहित्य मिळत नाही. असे असताना अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे शिफारस करून सोळशी खोऱ्यातील वळवी व सावे वस्तीवर विद्युतीकरण करण्याची शिफारस पत्र दिले. एवढेच नव्हे तर या शिफारस पत्राचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी निधी खर्ची पाडण्यात आलेला आहे. याचबरोबर खिरखिंडी ,महाळुंगे व आजूबाजूच्या गाव असून सुद्धा या गावांमध्ये अद्यापही वीज पुरवठा झालेला नाही. सदरच्या ग्रामस्थांनी आ. पाटील यांचे अनेकदा भेट घेतली पण धनदाडक्यांसाठी आ. पाटील हे धनलोभी नायक झालेले असून त्यांनी आता नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा. असेही युवानेते विराज शिंदे यांनी सुचित केले. आमदार पाटील हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची वारस समजत आहे. त्यांनी त्या विचारासारखं वागावे . असेही त्यांना सल्ला दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात व काँग्रेस पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजिंक्य शिंदे , सलीम बागवान, मनोज तपासे व ग्रामस्थ उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या लाभनायक आ .पाटील यांच्या विरोधात झाडाणी प्रकरणी झाडा झडती….
RELATED ARTICLES