ताज्या बातम्या

साताऱ्यात लोकशाहीर याच्या जयंतीनिमित्त साहित्य दिंडी व अभिवादन कार्यक्रम

सातारा(अजित जगताप) : पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर उभे आहे असे साहित्यातून ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ तथा तुकाराम भाऊराव साठे यांची १०६ वी जयंती साताऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळेला साहित्य दिंडी व अभिवादन कार्यक्रमाने लोकशाहीर यच्या विचारांना मानाचा मुजरा करण्यात आला.
एक ऑगस्ट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त लोकशाहीर यांच्या लेखणीतून क्रांती घडवणाऱ्या साहित्याच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबऱ्या, कथा, काव्य अशा सर्व पुस्तकांची ही साहित्य दिंडी साताऱ्यातील छत्रपती शाहू चौक, डॉ . बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीरअण्णाभाऊ साठे पुतळा अशी काढण्यात आली. याचा मूळ उद्देश बहुजन समाजामध्ये लोकशाहीर आण्णा यांनी केलेल्या लिखाणाची व कामाची माहिती पोहोचावी व समाजामध्ये परिवर्तनाची विचारधारा रुजावी. यासाठी संयुक्त जयंती समारोह समिती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती यांच्या वतीने या साहित्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. पल्लवी साठे- पाटोळे, कार्याध्यक्ष बाबू वायदंडे, गणेश वाघमारे, युवा नेते ऋषिकेश गायकवाड, गणेश भिसे ,अशोक बापू गायकवाड, अमर भाऊ गायकवाड ,संदीप कांबळे, नागेश सातपुते, निरंजन खुडे, गौरी आवळे, असे विविध मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी होते. रिपब्लिकन पक्षाचे नेते दादासाहेब ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली
संविधान रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. जग बदल घडवूनी गेले राव… सांगून गेले मज भीमराव.. अशी काव्यपंक्ती लिहून प्रेरणा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ही मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली आहे. विविध कार्यक्रमाने सध्या संपूर्ण सातारा हा अण्णाभाऊमय झाला आहे. सातारा जिल्ह्यातील साहित्यिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये परिवर्तनवादी विचारांची तुतारी फुंकली आहे. आपल्या साहित्याच्या लेखणीतून गावकुसाबाहेरील फकीरा त्यांनी नायक म्हणून उभा केला. तीच फकीरा कादंबरी हातात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा सातारा शहरात मोठ्या दिमाखात उभा राहिलेला आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर विद्युत रोषणाई व विविध कार्यक्रमाने कार्यकर्त्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. पिवळे झेंडे पिवळ्या पताका सोबतच जयंतीनिमित्त पिवळ्या गोड जिलेबीचाही अनेकांनी आस्वाद घेतला. समितीचे पदाधिकारी किशोर गालफाडे यांनी अनेकांच्या जिलेबी वाटप करून आनंद उत्सव साजरा केला.

१ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या अक्षर अण्णाभाऊ साठे जयंतीचे स्वरूप व कार्यक्रम अभिवादन व पुष्पहार अर्पण करताना त्यांच्या फकीरा कादंबरीचे हे पूजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांसोबत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, संदीप चव्हाण, नगराध्यक्ष अमोल मोहिते व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहली गेली आहे.
समतेची मशाल प्रज्वलित करून पुनम शंकर कवळे, समितीचे पदाधिकारी रघुनाथ बाबर, किशोर गालफाडे, ऋषिकेश गायकवाड, अण्णा वायदंडे, सत्यवान कमाने, अजित जगताप, अँड .संतोष कमाने, जगदीश कांबळे, डॉ. रमाकांत साठे, अमर गायकवाड, नितीन तुपे, सचिन पाटोळे, गौतम भोसले, माधव साठे, आयेशा पटणी, सीमा जगताप,रामचंद्र दुबळे, गणेश वाघमारे, राजेंद्र ओव्हळ , मदन खंकाळ, दत्ता केंगार, दाऊद खान मुल्ला, महादेव सकट, विलास सकट, बबन निकम, अमोल पाटोळे यांच्यासह फुले-शाहू- आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकशाहीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी युगपुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. सातारा नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेवक सचिन पाटोळे, नगरसेवक भालुगडे व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भोवती विद्युत रोषणाई तसेच पिवळ्या ध्वजाने संपूर्ण पुतळा परिसर हा पिवळामय करण्यात आला होता.
लोकशाहीर याच्या जयंतीनिमित्त
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पोवाडे, लोकनाट्य, आणि त्यांच्या साहित्यावर आधारित गायन-नृत्य कार्यक्रम व वैचारिक प्रबोधन व्याख्यान आणि विचारमंथन होत आहे.

——————————————–
फोटो– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात अभिवादन करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप)

Scroll to Top