मुंबई (दादर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादर (पश्चिम) येथील जानकीबाई शिक्षण संस्था संचालित विकास विद्यालय, अशोकवाडी, केशवराव दाते मैदानासमोर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवसेना माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्या आयोजनातून झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना छत्र्या, वह्या, पाण्याच्या बाटल्या आदी शालेय उपयोगाच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, महिला शाखा संघटक रीमा पारकर, उपशाखाप्रमुख रविकांत पड्याची, बाळू पळशीकर यांच्यासह शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांनी कौतुक केले.




