ताज्या बातम्या

वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा; जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप

कराड(प्रताप भणगे) : येरवळे (ता. कराड) येथील युवा

सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा, विठोबाचीवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षणाला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक तसेच श्री. नितीन यादव यांचे मित्रपरिवार उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. नितीन यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Scroll to Top