ताज्या बातम्या

डॉ. अदिती दीपक भातुसे शिवसेनेकडून सन्मानित ; गुणवंत विद्यार्थ्यांचाही केला गौरव

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांच्या सुकन्या अदिती यांना त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.ए तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मागाठाणे विधानसभा निरीक्षक, सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. १२ तर्फे विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. बोरीवली पूर्व येथील कै. मोहन वाघ उद्यान, टाटा संग्राही केंद्र आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात एमबीबीएस पदवी प्राप्त डॉ. अदिती भातुसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार विलास पोतनीस, युवासेनाऐ कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू तसेच नगरसेविका सारिका शशिकांत झोरे उपस्थित होते.

Scroll to Top