नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील नवी मुंबई शहर पथ विक्रेता समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमताने निवडून आलेले जावली तालुक्यातील गांजे गावचे सुपुत्र तथा कोपरखैरणे विभागातील रहिवासी श्री अनिल गेणू चिकणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, नवी मुंबई आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ह.भ.प. विठोबादादा संकपाळ यांच्या हस्ते श्री चिकणे यांना सन्मानित करण्यात आले. पथ विक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्यरत राहून समितीच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री चिकणे यांच्या सामाजिक कार्याचा आणि पथ विक्रेत्यांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे पथ विक्रेत्यांच्या विविध समस्या सोडविण्यास आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




