मुंबई : पनवेल येथील उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते संजय बबनराव ननावरे यांची शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदान, विविध लोकोपयोगी उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजारामबुवा शेलार यांनी ननावरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी संघटक सचिव संदीप अनंत जाधव तसेच धगधगती मुंबईचे संपादक व प्रतिष्ठानचे राज्य कार्यकारिणी सदस्य भीमराव धुळप उपस्थित होते.
संजय ननावरे यांनी उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांना मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे प्रतिष्ठानच्या कार्याला अधिक बळ मिळून राज्यभरातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




