मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान.श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा.आमदार, शिवसेना सचिव, प्रवक्ते आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा. श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार मानण्यासाठी दिनांक २६/०४/२०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे बैठक घेण्यात आली.या बैठकी मध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर यांचे मनापासून आपल्या भाषणात आभार व्यक्त केले.
श्री.किरण पावसकर यांनी आपल्या भाषणात सांगितले मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विनाअनुदानित शाळांना अनुदान सुरू करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याच वाचवल्या तसेच मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या होत्या त्या मराठी शाळांना मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे आणि अनुदान मंजूर करून देण्याचे काम फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळेच झाले. तसेच जे शिक्षक ७००० आणि ८००० रुपये महिना इतक्या कमी वेतनात काम करत होते आज त्या शिक्षकांना ५०,००० ते ६०,००० महिना पगार सुरू झाला याचे श्रेय शिंदे साहेबांनाच दिले पाहिजे. तसेच शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे साहेब, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीम. राजश्री शिरवाडकर, शिक्षण समिती सदस्य श्रीम.अंजली नाईक मुंबई महानगरपालिका शिवसेना गटनेते श्री.अमेय Spam, माजी शिक्षण समिती सदस्य श्री.मंगेश सातमकर यांच्या सहकार्यामुळे या निर्णयास जलदगती मिळाली असे सांगितले.
याप्रसंगी सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेना उपाध्यक्ष श्री. दिलीप नाईक श्री. संदीप जाधव चिटणीस श्री. तातू नाईक श्री. सचिन लिमन श्री.सचिन साळुंखे श्री. सुहास गायकवाड तसेच संस्थाचालक श्री. सुरेश लाखन श्री. विवेक थोरात श्री. विशाल बंडगर, राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाचे उपाध्यक्ष श्री. अमर पाचांगणे, सरचिटणीस संतोष रावताळे, जयदीप पाटील रमेश पवार, अरुण पवार, विनोद यादव, कार्यालय प्रमुख श्री. कार्तिक पवार व मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.




