ताज्या बातम्या

पाचवड येथे कातकरी समाजासाठी घरकुल प्रकल्पाला गती; मान्यवरांची पाहणी, वृक्षारोपण व थेट संवाद

सातारा(DDM न्युज) :

वाई तालुक्यातील पाचवड येथे प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजासाठी उभारण्यात येत असलेल्या २१ घरकुलांच्या बांधकाम प्रकल्पाला गती मिळाली असून आज मान्यवरांनी स्थळभेट देत कामाचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (विभागीय आयुक्त, पुणे), संतोष पाटील (जिल्हाधिकारी, सातारा), डॉ. खरमाटे (उपविभागीय अधिकारी, वाई), सोनाली मेटकरी (तहसीलदार, वाई), नारायण घोलप (गटविकास अधिकारी, वाई) तसेच महेश गायकवाड (सरपंच, पाचवड) उपस्थित होते.
मान्यवरांनी सुरू असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची सविस्तर पाहणी केली. कामाची गुणवत्ता, गती आणि नियोजनाबाबत समाधान व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच कातकरी समाजातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व सूचना जाणून घेण्यात आल्या. शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचे पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे कातकरी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येणार असून, शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रभावी अंमल होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Scroll to Top