ताज्या बातम्या

दिव्यपूर्ती’ चर्चासत्रात डॉ. सुरेखा पाटील यांचा विशेष सन्मान

दिव्यपूर्ती’ चर्चासत्रात डॉ. सुरेखा पाटील यांचा विशेष सन्मान
मुंबई : जागतिक पुस्तक दिन निमित्त गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी एन.सी.पी. ए.

येथे ‘दिव्यपूर्ती’ (दिव्यांगांच्या प्रेरणादायी कथा) या पुस्तकावर आधारित विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक अनुभव दिला.

‘दिव्यपूर्ती’ या पुस्तकात दिव्यांगांच्या जिद्दी, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेच्या कथा मांडण्यात आल्या असून, समाजात प्रेरणा देणारे हे एक महत्त्वपूर्ण साहित्य म्हणून समोर आले आहे.
या निमित्ताने आयोजित पॅनेल परिसंवादात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, महाराष्ट्र राज्य – मराठी भाषा विभाग), श्री. माणिक गुरसाळ (सचिव, महाराष्ट्र राज्य – दिव्यांग कल्याण विभाग), श्रीमती सुजाता जाधव (क्यूरेटर – पेज टू स्टेज, साहित्य उपक्रम, एनसीपीए), डॉ. सुरेखा पाटील (संस्थापिका – सुहित जीवन ट्रस्ट, पेण) आणि डॉ. वीणा तारकुंडे (लेखिका – दिव्यपूर्ती) यांचा समावेश होता.
परिसंवादात डॉ. सुरेखा पाटील यांनी दिव्यांग क्षेत्रातील आपल्या २८ वर्षांच्या कार्याचा अनुभव मांडत सकारात्मक दृष्टिकोन आणि समाजातील बदलांची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमात दिव्यांग क्षेत्रातील गेल्या २८ वर्षांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुरेखा पाटील यांचा मानचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Scroll to Top