ताज्या बातम्या

“हो भिम बाबा सारखा!” – बालगायक रक्षित मोरेचा सुरेल आवाज चर्चेत

मुंबई(रत्नकांत सावंत) : राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावचे सुपुत्र, ख्यातनाम गायक, कवी व संगीतकार श्री राकेश वंदना तुकाराम मोरे यांचा अवघ्या सहा वर्षांचा मुलगा कु. रक्षित शितल राकेश मोरे याने एआय व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलेले “हो भिम बाबा सारखा” हे गीत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
लहान वयातच प्रभावी गायन करत रक्षितने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवत शिक्षणाचे महत्त्व अत्यंत सुंदररीत्या मांडले आहे. या गीताचे गीतकार श्री अनिल वेंगसरकर यांनी आशयपूर्ण शब्दांत समाजप्रबोधनाचा संदेश दिला आहे.
या गाण्याचा व्हिडिओ विशेष आकर्षण ठरत असून त्यात रक्षित आणि त्याची आई सौ. शितल राकेश मोरे यांच्यावर चित्रिकरण करण्यात आले आहे. या माय-लेकरांच्या सादरीकरणाचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
रक्षितचा सुमधुर आवाज आणि गीतातील सामाजिक संदेश यामुळे हे गाणे अल्पावधीत लोकप्रिय ठरत असून, भविष्यात अशाच प्रबोधनात्मक गीतांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

Scroll to Top