ताज्या बातम्या

मनस्वी ग्रुपतर्फे महिलांसाठी ‘कॅन्सर मुक्त अभियान’

मुंबई : मनस्वी ग्रुपची ही एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून काम करीत आली आहे. मनस्वी ग्रुपचे संस्थापक विजय झिमुर यांच्या मातोश्री वत्सला रघुनाथ झिमुर यांचा आज सहावा स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मनस्वी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कॅन्सर मुक्त अभियान राबविण्यात आले.या दिवसाच्या निमित्ताने पारंपरिक विधी करण्याऐवजी मुंबईस्थित घरकाम करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कॅन्सर मुक्त अभियान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात आज एम ओ सी कॅन्सर रिसर्च सेंटरच्या डॉ. कृती कदम यांनी महिलांना कॅन्सर विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
“महिलांनी आपला उदरनिर्वाह करीत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. यासाठीच आमच्या संस्थेकडून सातत्याने असे उपक्रम राबविले जातात” असे उद्गार या वेळी समाजसेविका आशाताई झिमूर यांनी काढले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनस्वी ग्रुपच्या महिलांसाठी साड्या वाटप कार्यक्रम सुद्धा करण्यात आला.
जनकल्याण सोशल फाऊंडेशन व संतोष थोरात, राजू शिरधनकर यांनी या महिलांचे नियोजन केले.
मनस्वी ग्रुपच्या वतीने शंकर झिमुर,दिनेश झिमुर,सोनाली झिमुर तसेच मनस्वी झिमुर यानी अथक परिश्रम घेतले.

Scroll to Top