ताज्या बातम्या

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सावित्रीबाई फुले उद्यानात वृक्षारोपण

मुंबई : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मरोळ चर्च रोड (अंधेरी पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले उद्यानात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या हस्ते चाफ्याचे रोपटे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटे, सहायक आयुक्त श्री. नितीन शुक्ला तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संरक्षण, हरित मुंबई आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने अशा उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले.

Scroll to Top