ताज्या बातम्या

ऐतिहासिक महादरे–हत्ती तलाव सुशोभिकरण लवकरच; २८ एकरमध्ये बगीचा व विरंगुळा केंद्र ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती

सातारा – शहरातील ऐतिहासिक महादरे तलाव व हत्ती तलाव परिसराचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार असून सुमारे २८ एकर जागेवर बगीचा, विरंगुळा केंद्र व इतर सुविधा उभारल्या जाणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

यांनी पाहणीदरम्यान ही माहिती दिली.
सातारा नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानातून मिळालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परिसरात पाणीसाठा टिकवून ठेवणे, स्वच्छता व नैसर्गिक स्रोतांचा उपयोग यावर भर दिला जाणार असून प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. या भागातून प्रस्तावित रिंगरोड जाणार असल्याने दळणवळण सुलभ होऊन पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.
याशिवाय दरे गावातील फुलपाखरांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. पर्यावरण तज्ज्ञ व संशोधकांच्या सहकार्याने हा परिसर विकसित केला जाईल. वणवे रोखण्यासाठी जनजागृतीसोबत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री भोसले यांनी दिल्या. या प्रकल्पामुळे नागरिकांना विरंगुळ्याची जागा उपलब्ध होऊन साताऱ्याच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार आहे.

Scroll to Top