मुंबई (शांताराम गुडेकर) : मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आणि आदर्श मुंबई फाउंडेशन तसेच ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स,संविधान जागरण परिषद -२०२६ च्यावतीने भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ वितरण सोहळा नुकताच विक्रोळी पूर्व येथील विकास कॉलेज सभागृह, कन्नवार नगर येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला.पुरस्कार सोहळ्यात घाटकोपर येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक,मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ” भारत रत्न गौरव श्री पुरस्कार-२०२६ मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारला.त्यांच्या सोबत राजेंद्र पेडणेकर,प्रकाश कुष्टे हे सहकारी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संजय भोईर आयोजक, शिवश्री काजी सोहेल शेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव वकील पारसनीस शिवश्री काजी हैदर यांचे तेरावे वैशज, सुभेदा महेंद्र गवई भारतीय लष्कर,सानिका मोजर अभिनेत्री, ज्योतीताई दुराफे उपाध्यक्ष महिला मोर्चा मुंबई,आदी सामाजिक क्षेत्राबरोबरच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम व नेटनेटके आयोजन मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आणि आदर्श मुंबई फाउंडेशन तसेच ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स,संविधान जागरण परिषद यांच्यातर्फे करण्यात आले होते.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो.यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या घाटकोपर येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार यशवंत खोपकर याना विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना ” भारत रत्न गौरव श्री पुरस्कार- २०२६ देण्यात आला.गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, दौलत बेल्हेकर , वसंत घडशी, गंधाली मयेकर, निर्मला आवटे, राजेंद्र पेडणेकर, संतोष चादे, वैभव डोके, महेश कुलकर्णी, विश्वास तेली, राजेंद्र चिखलकर, संतोष होलब यांच्या सहकार्यने यशवंत खोपकर सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.




