ताज्या बातम्या

नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचा पत्रकारांशी सुसंवाद

SDM न्यूज : नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी आज महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षाला भेट देत विविध वृत्तपत्र व वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधींशी संवाद साधला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती नागरिकांपर्यंत पोहचत असते, त्यामुळे पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगत पत्रकारांनी यावेळी मांडलेल्या विविध बाबींवर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर महोदयांनी दिले. याप्रसंगी विविध वृत्तपत्र व वृत्तचित्रवाहिनी यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामन उपस्थित होते.

Scroll to Top