
सातारा(अजित जगताप) सातारा दि: गेल्या महिन्याच्या २० मार्च रोजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी सातारा जिल्हा गाजला. याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्हा परिषद सदस्य अपहरणाचा गुन्हा होय. आता महिन्याभरानंतर ज्यांच्या अपहरण केले त्याच सदस्यांनी स्वतःच्या वाहनातून एका आरोपीला सोबत घेऊन सातारा जिल्हा परिषद सभागृहात धडक मारली. या प्रकाराने खऱ्या अर्थाने पुरावात सादर केल्याची चर्चा रंगू लागलेली आहे. याबाबत माहिती अशी की, महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिवशी म्हणजे २० मार्च रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी, अपक्ष अशा चारही बाजूने जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात व्हिप प्रमाणे मतदान करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. परंतु त्याच वेळेला सातारा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी रात्री दाखल केलेल्या सातारा शहरातील अपहरणाच्या गुन्ह्याबाबत दोन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या आरोपीला तातडीने अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या. वास्तविक पाहता ज्यांचे अपहरण झाले. ते सातारा जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू शिंदे आणि ज्यांनी अपहरण केले हा गुन्हा दाखल केला ते संदीप मांडवे व अनिल देसाई हे जिल्हा परिषद सभागृहात आले होते. त्याच वेळेला सातारा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकारी अरुण देवकर व रमेश गर्जे या पोलीस अधिकाऱ्यांनी व अनेक पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल मिळावा. म्हणून अक्षरशा अपहरण चित्रपटातील दृश्य सारखे या दोन सदस्यांना सभागृहातून जबरदस्तीने बाहेर घेऊन गेले. सकाळी शहर पोलीस ठाण्या त्यानंतर महाबळेश्वरच्या दिशेने त्यांना घेऊन गेल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडीसाठी मतदान करता आले नाही. आणि भाजपला अपेक्षित रित्या अध्यक्ष उपाध्यक्ष करता आले. यामध्ये पोलीस अधिकारी व यंत्रणेचा सिंहाचा वाटा होता. अशी टीका सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी करून याबाबत आता न्यायालयात धाव घेतली आहे. या घटनेच्या बाबत आजही चर्चा होत असताना महिन्याभरानंतर शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य व अपहरण गुन्ह्यातील आरोपी संदीप मांडवे यांच्या सातारा येथील घरी जाऊन चक्क ज्यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. ते जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू शिंदे यांनी त्यांना घेऊन जिल्हा परिषद सभागृह गाठले. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला. वास्तविक पाहता जगामध्ये अशी कधीच घटना घडली नाही की, अपहरण ज्यांच्या झालेल्या त्यांनी आरोपीला घेऊन आलेले आहेत. परंतु अशी ही साताऱ्याची तऱ्हा सातारकर यांना बघावी लागत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विषय समितीच्या सदस्यांच्या निवडीच्या वेळेला फक्त सभागृहामध्ये शिवसेना राष्ट्रवादी व अपक्ष सदस्य लवकर आले होते. तर दुपारी एक वाजल्या तरी सुद्धा भाजपचे सदस्य आले नव्हते. हे मात्र पत्रकारांना पहावी लागले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भैया भोसले, सदस्य अनिल देसाई, उदय कबुले, अजित साळुंखे , सौ.जयश्रीताई गिरी , राष्ट्रवादीचे पदाधिकारी श्रीनिवास शिंदे, विराज शिंदे व जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुरळक पोलीस बंदोबस्त असल्यामुळे सर्व काही शांततेच्या वातावरणात निवडी पार पडल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बंद करण्याची वेळ आली नाही. अशी कुजबूज सुरू झाली आहे …………………………………… फोटो सातारा जिल्हा परिषदेमध्ये अपहरण नाट्य नंतर जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे व आरोपी संदीप मांडवे एकाच वाहनातून आले. (छाया– अजित जगताप, सातारा)




