सोडतीच्या प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अजय साबळे यांनी आयुक्त तथा नगरपरिषद प्रशासन संचालनालय संचालक यांच्या दि. १३ एप्रिल, २०२३ च्या परिपत्रकाचे वाचन केले. या परिपत्रकानुसार महिलांसाठी आरक्षित ठेवण्याच्या तीन जागांपैकी एक खुल्या प्रवर्गासाठी असेल तर उरलेल्या दोन जागा ह्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक आणि विकलांग/ दिव्यांग या प्रवर्गांमधून चिठ्ठी सोडतीद्वारा निश्चित करण्यात आल्या.
शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते दोन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामध्ये पहिली चिठ्ठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला आरक्षण विषयक दिसून आली तर तर दुसरी चिठ्ठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिला आरक्षण विषयक दिसून आली. याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी महिलांच्या दोन जागा इतर मागास प्रवर्ग आणि अनुसूचित जाती प्रवर्ग या दोन प्रवर्गासाठी निश्चित झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजय साबळे यांनी केली. महिला आरक्षणाच्या दोन जागा सोडत चिठ्ठीद्वारे निश्चित झाल्यानंतर एकूण प्रवर्गनिहाय आरक्षण खालील प्रमाणे निर्धारित झाले आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षण एकूण 8 जागा –
|
प्रवर्ग
|
जागा
|
स्थिती
|
|
अनुसूचित जाती
|
महिला राखीव
|
1
|
|
अनुसूचित जमाती
|
सर्वसाधारण
|
1
|
|
अल्पसंख्यांक
|
सर्वसाधारण
|
1
|
|
इतर मागास प्रवर्ग
|
महिला राखीव
|
1
|
|
दिव्यांग /विकलांग
|
सर्वसाधारण
|
1
|
|
सर्वसाधारण
|
सर्वसाधारण महिला राखीव
|
1
|
|
सर्वसाधारण
|
सर्वसाधारण
|
2
|
|
एकूण जागा–
|
8
|
या सोडत कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, वाहतुक पोलीस विभागाचे सहा.पोलीस आयुक्त श्री.विजय चौधरी, परवाना विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. शिल्पा देशपांडे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.दिलीप गायकवाड आणि श्रीम.स्वाती तांडेल यांच्यासह परवाना विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
प्रास्ताविक व आभार श्री दिलीप गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मानले.