ताज्या बातम्या

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आमदार अमिन पटेल यांचा पुढाकार; जर्नालिस्ट असोसिएशन ची भेट अॅड. स्मिता चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली

मुंबई : ॲड. स्मिता चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली जर्नालिस्ट असोसिएशन च्या शिष्टमंडळाने आज आमदार अमिन पटेल यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

या भेटीदरम्यान, आमदार अमिन पटेल यांनी अलीकडील अधिवेशनात पत्रकारांचे प्रश्न ठळकपणे मांडल्याबद्दल चर्चा करण्यात आली. त्यांनी अधिवेशनात पत्रकारांची बाजू ठामपणे मांडत त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
आजच्या बैठकीत आमदार पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत पुढील पावले उचलण्याचे आश्वासन दिले. यामध्ये मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हे मुद्दे मांडणे, तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयापर्यंत हे प्रश्न पोहोचवणे यांचा समावेश आहे. तसेच, माहिती व प्रसारण मंत्र्यांची भेट घेऊन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचेही त्यांनी सांगितले.
याच वेळी, जर्नालिस्ट असोसिएशन च्या वतीने आमदार अमिन पटेल यांना शाल व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
“पत्रकारांचे प्रश्न थांबता कामा नयेत. त्यांना योग्य तो मार्ग मिळालाच पाहिजे,” असे ठाम मत आमदार अमिन पटेल यांनी व्यक्त केले.
Scroll to Top