नवी मुंबई ( ओमकार भिमराव धुळप) : सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, नवी मुंबई संचालित शारदा विद्या मंदिर प्री स्कूल (S.V.M. English Pre School) येथे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तसेच समाजातील विशेष व्यक्तिमत्वांच्या सन्मानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जीवनदीप प्रकाशनचे डॉ. गोरखनाथ पोळ सर , नगरसेवक संदीपदादा म्हात्रे, नगरसेवक रॉबिन मढवी, C.A. काजल संकपाळ या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तसेच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. सविता पोळ मॅडम महिला उद्योजिका ,ॲड. भारतीताई पाटील , सौ. चंद्रभागाताई मोरे, सौ. ॲड. साईलीताई शिंदे, सौ. दिपालीताई सकपाळ , कुमारी तीर्था सकपाळ या सर्व (नवी मुंबईतील कार्य कर्तृत्ववान महिला नगरसेविका ) मान्यवर महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. लहान मुलांच्या नृत्य, गीत आणि नाट्यप्रयोगांनी कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाला महंत गगणगिरी मॅडम, सुरेश सकपाळ, पत्रकार भिमराव धुळप ,मारुती सकपाळ, लेखक साहित्यिक साठे सर ,सुरेश शिंदे, अरुण सातपुते, अशोक महाराज, राजेंद्र मोरे , आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे मार्गदर्शक श्री बाबुरावदादा संकपाळ (मा.जि.प. सदस्य) हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती सदस्य हरीभाऊ संकपाळ , अंकुश संकपाळ , किशोर इथापे सर, संजय मोरे, राजेश देसाई, किसन शिंदे, सुयश संकपाळ आणि अंकित संकपाळ , ओमकार धुळप यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लांडगे पाटील सर यांनी , प्रास्ताविक अध्यक्ष रमेश संकपाळ सर यांनी , तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका दिपाली संकपाळ मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.




