ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

अमेरिकेतील लेखिकेच्या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

मुंबई(देवेंद्र भुजबळ) : अमेरिकेत आणि भारतात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या विविध स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असलेल्या;अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांच्या ” जिचं तिचं आकाश ” ह्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी विले पार्ले ( पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सभागृहात होत आहे.

या प्रकाशन सोहोळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका श्रीमती अंजली सामंत, प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे संचालक
श्री अरविंद प्रभू आणि ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश
हिंगलासपूरकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभिनेत्री रजनी वेलणकर ह्या भूषविणार आहेत.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन सौ अलका भुजबळ करणार आहेत.

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर
उठून दिसणारे ह्या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे सर्व कथा नायिका, लेखिका, प्रकाशिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह्या सर्व महिलाच आहेत.

ह्या पुस्तकाची निर्मिती ग्रंथाली ने केली असून
न्यूज स्टोरी टुडेने प्रकाशन केले आहे.

Scroll to Top