ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

डाकेवाडी येथे ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 16 मार्चला शासकीय योजनांचे शिबीर

तळमावले/वार्ताहर : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. श्री. शंभूराज देसाईयांच्या संकल्पनेतून ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आणि अंमलबजावणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवार, दिनांक 16 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त मंदीर डाकेवाडी (काळगाव) ता.पाटण, जि.सातारा येथे संपन्न होणार आहे.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणे आणि प्रलंबित कामे मार्गी लावणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी येताना आपले आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे, जेणेकरून अर्जांची प्रक्रिया त्वरित पूर्ण करता येईल.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी मो.8446614283 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top