ताज्या बातम्या

राज्य स्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धत शाळा क्रमांक 78 ने पटकावला नंबर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ७८ यांनी केंद्र स्तरावर प्रथम आणि नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सदरील स्पर्धचे आयोजन ग्रंथाली प्रकाशन, अन्वय प्रतिष्ठान आणि नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत पद्मश्री शरद काळे लिखित नाट्यातून विज्ञानाकडे या पुस्तकातील पुस्तके आपली मित्र आहेत ही नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. दिग्दर्शक म्हणून रीता नागज्योती आणि नारायण लांडगे यांनी भुमिका बजावली. सदरील फेरीतील बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी माजी महापौर सुधाकर सोनवणे , प्राचार्य डॉ अजित मुगदूम, अनिल लाड, परिक्षक प्रा. कल्याणी पाटील, प्रा. मनोज मयेकर , मुख्याध्यापक स्नेहल विशे, अविनाश जाधव, कमलेश इंगळे उपस्थित होते. या यशाबद्दल मा. मुख्याध्यापक जयप्रकाश पाल व शाळेतील शिक्षकांसह मान्यवरांनी अभिनंदन केले.

Scroll to Top