सरताळे (ता. जावली) : महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता
महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय, शिवदत्त मठ, कापसेवाडी, पो. सरताळे, ता. जावली, जि. सातारा. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष महंत राजेंद्रगिरीजी महाराज हे विराजमान राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. ह.भ.प. सौ. जयश्रीताई सुहास गिरी (सदस्य, जिल्हा परिषद सातारा), महंत अहिल्यागिरी (शिवदत्त मठ, कापसेवाडी), श्री. संजय धुमाळ (गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती जावली), श्री. प्रवीण मोरे (विस्ताराधिकारी, कुडाळ बीट), सौ. वंदना गंगावणे (केंद्रप्रमुख, कुडाळ) तसेच निशाताई आनंद लोहार (आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राज्य संघटना, महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष) उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री. अशोक राजाराम मोने (माजी नगराध्यक्ष, सातारा), मा. श्री. लक्ष्मणराव पवार (माजी सरपंच, ग्रामपंचायत सरताळे), सौ. अमृता जाधव (सरपंच, ग्रामपंचायत सरताळे), श्री. दिनेश गायकवाड (उपसरपंच, ग्रामपंचायत सरताळे), दस्तगीर शेख (चेअरमन, विकास सेवा सोसायटी सरताळे), श्री. संतोष शिंदे (विश्व हिंदू परिषद कार्यकारणी सदस्य), मा. श्री. सौरभवावा राजेंद्र शिंदे (सदस्य, पंचायत समिती जावली), सौ. स्वाती पवार (पोलीस पाटील), श्री. पिंटू भिले (तंटामुक्ती अध्यक्ष), वसीम शेख (पत्रकार, सरताळे) आणि महेश बारटक्के (पत्रकार, कुडाळ) उपस्थित राहणार आहेत.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास सरताळे, काळेवाडी, गणेशवाडी व कापसेवाडी येथील ग्रामस्थांनी तसेच पालक व आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. जयवंत शंकर तरडे, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती व आजी-माजी विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.




