प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या न्यूज18 नेटवर्कने भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक्झिट पोलचा सर्व्हे केला आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.जाहिरातन्यूज 18 नेटवर्कच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो पण त्यांच्या मिशन 45 प्लसच्या स्वप्नाला मोठा धक्का बसू शकतो. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी महायुतीला 32 ते 35 जागा तर महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपला 20 ते 23 आणि काँग्रेसला 6-9 जागांवर विजय मिळू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं, त्यामुळे यंदा त्यांच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.महाराष्ट्रात महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा आणि काँग्रेसला 6-9 जागा मिळत असतील तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मिळून 9 ते 12 जागांवर विजय होऊ शकतो.दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपला 20 ते 23 जागा मिळत असतील तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळून 13 ते 15 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रात भाजपने 28 तर शिवसेनेने 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा लढवल्या होत्या. तर महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा लढवल्या. काँग्रेसने 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या.
महाराष्ट्रात सर्वाधिक जागा कोणाला ? की सहानुभूतीची लाट
RELATED ARTICLES