Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरएसटीचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा राज्य भर उत्साहात साजरा..!

एसटीचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा राज्य भर उत्साहात साजरा..!


मुंबई :(१ जुन) एसटीचा ७६ वा वर्धापनदिन सोहळा एसटी कर्मचारी व अधिकारी यांनी राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठया उत्साहात साजरा केला. सर्व बसस्थानके स्वच्छ व टापटीप करून दर्शनी भागात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. अनेक बसस्थानकावर फुला पानांचे तोरण बांधण्यात आले होते. सकाळी उपस्थित सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या साक्षीने एसटीची पुजा-अर्चा केली. काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन व साखर-पेढे वाटून एसटीच्या ७६ व्या वर्धापन दिनांच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments