पनवेल(अमोल पाटील) : रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना सुपर संडे ला पळस्पे जिल्हा परिषदेत मोटरसायकल रॅली रविवारी सकाळी ११.०० वाजता कोन तालुका पनवेल या ठिकाणाहून पळसपे जिल्हा परिषदेचे भाजपचे अधिकृत उमेदवार हर्षदा अतुल घरत व पंचायत समितीचे उमेदवार योगिता योगेश लहाने यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये युवक वर्ग मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कोन साईबाबा मंदिर, चिखले मार्केट कोन, ग्रुप ग्रामपंचायत कोन,आजीवली, शेडूंग गाव, बोर्ले, भिंगार, सांगडे, बेलवली, वारदोली ,ठाकूरवाडी, वादवा मार्गे भिंगारवाडी या गावोगावी कार्यकर्त्यांनी सहभाग घेत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये ५०० हून अधिक बाईक स्वार सहभागी झाले होते. उमेदवाराबरोबर कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेऊन शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची तोफ उडवली आहे.




